Dehuroad : ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख करून महिलेला पावणेसात लाखांचा गंडा!

एमपीसी न्यूज – ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या विवाह साईटवर ओळख झालेल्या एका इसमाने महिलेच्या भावाला एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी त्याने महिलेकडून 6 लाख 70 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न लावता महिलेची फसवणूक केली.

रेश्मा अजीज खान (वय 37, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अब्दुल रौफ हसवारे (वय 42, ,रा. मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल याने रेश्मा यांच्याशी ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या विवाह संस्थेच्या साईटवरून ओळख केली. लग्नाच्या बहाण्याने रेश्मा यांच्याशी जवळीक निर्माण केली.

दरम्यान अब्दुल याला माहिती झाले की रेश्मा यांच्या भावाला नोकरी हवी आहे. अब्दुल याने रेश्मा यांच्या भावाला एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध माध्यमातून अब्दुल याने रेश्मा यांच्याकडून सुमारे 6 लाख 70 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न लावता रेश्मा यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.