Dehuroad : फोटो आणि बनावट सह्यांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – शासनाच्या परवानग्या घेण्यासाठी भागीदाराचा फोटो आणि बनावट सहीचा वापर करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 जुलै 2016 ते 2 डिसेंबर 2019 या कालावधीत किवळेगाव येथे घडला.

संदीप दीनदयाळ अगरवाल (वय 38, रा. प्राधिकरण, निगडी), कपिल सतपाल अगरवाल (वय 35, रा. साधू वासवानी चौक, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहिदास भामराव तरस (वय 38, रा. विकासनगर, किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची साई रियालिटी, श्री साई इन्फ्राटेक, श्री साई बिल्डटेक या संस्थांमध्ये भागीदारी आहे. आरोपींनी बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणाऱ्या अर्ज आणि नकाशावर तरस यांच्या फोटोचा गैरवापर केला. तसेच बनावट सह्या करून त्याआधारे महापालिकेच्या भूमी अभिलेख कार्यालयातून बांधकाम परवानगी घेतली. आरोपींनी फिर्यादी तरस आणि शासनाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.