Dehuroad : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचे आदेश लागू असताना या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी मंगळवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई केली.

दीपक पांडे, विजय पिल्ले, रुपेश अलकोंडे, लाल्या अलकोंडे (सर्व रा. आंबेडकरनगर, देहुरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंत गायकवाड यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपींनी आंबेडकरनगर, देहूरोड येथे एकत्र येऊन आरडाओरडा करत आपसात भांडणे केली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.