Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत रविवारपासून चार दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

Four days of strict lockdown from Sunday in the cantonment boundary:कॅन्टोन्मेंट हद्दीत रविवारपासून चार दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोर्ड प्रशासनाच्यावतीने 5  जुलै ते 8 जुलै या कालावधीत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आतापर्यंत कोरोनाचे 25  रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दररोज दोन ते तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रविवारपासून सलग चार दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत दूधविक्री सकाळी 6  ते सकाळी 10  या वेळेत सुरु राहणार आहे. तर मेडिकल, सरकारी कार्यालये, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, बँका नेहमीप्रमाणे सुरु राहतील. अन्य सर्व दुकाने बंद राहणार राहणार आहेत. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.