Dehuroad : पूर्ववैमनस्यातून चौघांचा तरुणावर खूनी हल्ला!

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून एका तरुणावर खूनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी साडेचारच्या सुमारास विकासनगर, देहूरोड येथे घडली.

प्रशांत कैलास भालेराव (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डॅनी तांदळे, रोहित ओव्हाळ (दोघे रा. गंगानगर, आकुर्डी) आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी जखमी प्रशांत त्यांचे मित्र संतोष साबळे, शुभम जाधव यांच्यासोबत शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी दर्शन झाल्यानंतर तिघेही देहूरोड मधील विकासनगर येथे झिंगाट मिसळ या हॉटेलवर जेवणासाठी थांबले. त्यावेळी चार आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रशांत यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. यामध्ये प्रशांत यांच्या हाताला, डोक्याला, पायाला व कमरेवर गंभीर दुखापत झाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.