Dehuroad : रावण साम्राज्य टोळीतील सराईतासह तिघांना अटक

खंडणी दरोडाविरोधी पथकाची कारवाई; चार पिस्तूल, 22 काडतूस आणि कारसह साडेचार लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – देशी बनावटीची बेकायदेशीर पिस्तूल वापरल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे आणि एक टॅक्सी कार असा एकूण 4 लाख 54 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यातील एक आरोपी रावण टोळीचा सदस्य, दुसरा सराईत गुन्हेगार तर तिसरा रावण टोळीला अर्थसहाय्य करणारा आहे. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी पथकाने आदर्षनगर देहूरोड येथे केली.

सुमित उर्फ नकली उर्फ मारी गणेश पिल्ले (वय 27), सुलतान युसूफ खान (वय 20), मारुती वीरभद्र भंडारी (वय 30, सर्व रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी दरोडाविरोधी पथकातील पोलीस नाईक प्रवीण कांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पांढ-या रंगाची टॅक्सी (एम एच 14 / एफसी 1626) देहूरोड येथील एमबी चौक ते आदर्शनगर या भागात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती खंडणी दरोडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता प्रत्येकाच्या कमरेला एक पिस्तूल मिळाले. तसेच त्यांच्या कारची झडती घेतली असता कारच्या डॅश बोर्डमधून एक पिस्तूल असे चार पिस्तूल आणि 22 काडतुसे व एक कार असा एकूण 4 लाख 54 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला.

सुमित हा आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो रावण साम्राज्य टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुलतान याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी मारुती याला गुन्हेगारीबाबत आकर्षण असल्याने तो रावण साम्राज्य टोळीतील गुन्हेगारांना आर्थिक मदत करत होता. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना शनिवार (दि. 8) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोल्सी आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधवणे, राजेंद्र शिंदे, महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, शैलेश सुर्वे, शरीफ मुलाणी, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, निशांत काळे, आशिष बनकर, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.