Dehuroad : तरुणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – तरुणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून तिच्या अकाउंट वरून नातेवाईक तरुणीला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले. याप्रकरणी अज्ञातावर विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 42 वर्षीय डॉक्टर महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, mdsalim Ansari (रा. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर 2019 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादी महिलेच्या मुलीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले. मुलीच्या परवानगीशिवाय अकाउंटचे नाव बदलले. त्या अकाउंटवरून फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुलीला अश्लील मेसेज व फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केला.
याबाबत आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 509 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66, 43 (ए), 66 (सी), 66 (डी), 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.