Dehuroad : गुटखा विक्री प्रकरणी देहूरोड, निगडीत कारवाया; लाखोंचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने (Dehuroad) देहूरोड येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 51 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तर गुन्हे शाखा युनिट दोनने अजंठानगर निगडी येथे कारवाई करून एकास अटक केली. त्याच्याकडून एक लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

नामेरियाज आजीज शेख (वय 43, रा. पटेल रोड, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उद्धव खेडकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनला माहिती मिळाली. पोलिसांनी शेख याच्या घरी छापा मारून पाच लाख 51 हजार 962 रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Savarkar Gaurav Yatra : संपूर्ण राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार – मुख्यमंत्री

सचिन मोहनराव भापकर (वय 38, रा. चिखली) याला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर अवसरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा त्याच्या दुचाकीवरून गुटखा (Dehuroad) विक्रीसाठी जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सचिन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 18 हजार 646 रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.