Dehuroad : हॉटेल मालक आणि वेटरकडून ग्राहकांना मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण करत असताना अज्ञात व्यक्तीने ग्राहकाला कानाखाली मारली. कानाखाली मारणा-याची ओळख पटविण्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी करणा-या दोन ग्राहकांना हॉटेलचे मालक आणि हॉटेलमधील वेटरने मारहाण केली. ही घटना रावेत येथील राजवाडा हॉटेल येथे घडली.

विठ्ठल बलभीम सरेकर (वय 31, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय ढुमे आणि त्याच्या हॉटेलमधील पाच ते सहा वेटर विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल त्यांच्या भाच्यासोबत चिंचवडमधील हॉटेल राजवाडा येथे रविवारी साडेसहाच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले. जेवण करत असताना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल यांच्या भाच्याच्या कानाखाली मारली. याबाबत विठ्ठल यांनी हॉटेल मालक आणि कॅशियर यांच्याकडे विचारणा केली.

तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवून कानाखाली मारणा-याची ओळख पाठवावी, अशी विनंती केली असता हॉटेल मालक ढुमे आणि त्याच्या पाच ते सहा वेटरने मिळून विठ्ठल यांच्यावर चॉपरने वार केले. तसेच दोघांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.