Dehuroad : ताडीची बेकायदा विक्री जोरात – श्रीजित रमेशन

एमपीसी न्यूज – शाळकरी मुलीच्या (Dehuroad) गणवेशात देशी दारू विकताना नुकत्याच आलेल्या व्हिडिओबाबत अद्याप चौकशी सुरू असताना मामुर्डी येथील सिद्धार्थनगर येथे ताडीची अवैध विक्री जोरात सुरू असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केला आहे.

रमेशन म्हणाले, देहूरोड पोलिस त्यांच्या हद्दीत असे कोणतेही अवैध कृत्य सुरू असल्याचे नाकारत आहेत. मात्र, आज मामुर्डी येथील सिद्धार्थनगर भागात खुलेआम ताडीचे पार्सल दिले जात असल्याचा नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यांनी ग्राहकांना बसून ताडी पिण्यासाठी शेडही बनवले आहे. हा सर्व प्रकार देहूरोड पोलिसांच्या अखत्यारीत उघडपणे सुरू आहे.

Scrap Material E-Auction : महापालिका भंगार साहित्य ई-लिलावाद्वारे विक्री करणार

याचा योग्य तपास करून दोषी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत आहेत.  मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई (Dehuroad) झालेली नाही. या नवीन बाबी उघडकीस आल्याने अशा बेकायदेशीर कामांना पाठीशी घालणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यावर पोलिस आयुक्त काय कारवाई करणार? असा सवालही त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.