Dehuroad : कॅन्टोन्मेंटसह धर्मादाय व खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करा : रघुवीर शेलार

Implement Mahatma Phule Janaarogya Yojana in Charity and Private Hospitals including Cantonment: Raghuveer Shelar :या योजनेत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीचाही समावेश करावा

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धर्मादाय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या योजनेत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीचाही समावेश करावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. त्याची अंमलबजावणी सुरु झाली.

या कायद्यान्वये खासगी रुग्णायात कोरोना रुग्णांसाठी 80  टक्के बेड राखीव ठेवण्यात आले. मात्र, सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णायांकडून आकाराला जाणारा उपचाराचा खर्च परवडत नाही. खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ रकमेचे बिल आकारले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुणे शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. मात्र, लगतच्या पिंपरी चिंचवड आणि देहूरोड कॅन्टोमेन्ट तसेच पुणे ग्रामीणमधील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरु करणे गरजेचे आहे.

त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य घटकातील रुग्णांना या योजनेच्या माध्यमातून कोरोनावरील उपचार मोफत मिळतील. तसेच पैशांअभावी कुणीही कोरोनाच्या उपचारांपासून  वंचित राहणार नाही.

त्यामुळे कोरोनाचे संकट असेपर्यंत पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड हद्दीतील सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयामध्ये महात्मा फुले जण आरोग्य योजना सुरु करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत. त्याचबरोबर देहूरोड कॅन्टोमेन्ट हद्दीचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी शेलार यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.