Dehuroad : किन्हई, झेंडेमळा, चिंचोली, मामुर्डी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ घोषित

आजपासूनच (गुरुवार) हा परिसर सील करण्यात आला : Kinhai, Zhendemala, Chincholi, Mamurdi declared 'Micro Containment Zone'

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील किन्हई, झेंडेमळा, चिंचोली आणि मामुर्डी या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हा भाग आज, गुरुवारपासून ( दि. 13) ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आहे.

शनिवारपासून ( दि. 13) पुढील 14 दिवसांच्या कालावधीसाठी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन असेल, अशी माहिती  बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

या आधी 8 ऑगस्टला थॉमस कॉलनी, शितलानगर नं 1. , शितलानगर नं. २, आंबेडकर नगर, गांधीनगर आणि पारशी चाळ या भागामध्ये ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ घोषित करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून किन्हई, झेंडेमळा, चिंचोली आणि मामुर्डी या भागामध्ये भागातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

त्यानुसार आजपासूनच (गुरुवार) हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच हा भाग नियंत्रण कक्षाखाली घेण्यात आला असून या भागात निर्जंतुकीकरण केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर हरितवाल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.