Dehuroad : किवळे, विकासनगरला वीज बिले भरण्याची सक्ती नको ; अन्यथा आंदोलन : राजेंद्र तरस

Kiwale, Vikasnagar should not be forced to pay electricity bills; Otherwise movement: Rajendra Taras

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकट काळात महावितरणकडून ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीजबिले पाठविण्यात आली आहेत. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे जगणे असह्य झाल्याने त्यांना सध्या या भरमसाठ रकमेच्या वीज बिलांचा भरणा करणे अशक्य आहे. त्यामुळे महावितरणने किवळे, विकासनगर परिसरात वीज बिले भरण्याची सक्ती करु नये ; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्री राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी महावितरणच्या निगडी- प्राधिकरण येथील कार्यकारी  अभियंत्यांना  निवेदन दिले आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्चमध्ये देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. अडीच महिन्यनपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन होता. त्यामुळे या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

_MPC_DIR_MPU_II

व्यापारी, दुकानदार, छोटे व्यावसायिक यांचे प्रचंड नुकसान झाले. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक साहित्य विक्री वगळता सर्वच व्यवहार ठप्प होते.

अशा परिस्थितीमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नाही, खायला अन्न नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. मग हे नागरिक भरमसाठ रकमेची वीज बिले कुठून भरणार, असा सवाल तरस यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे पुढील शासन आदेश येईपर्यंत वीज बिल भरण्याची सक्ती करू नये तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून वीज बिलांच्या रकमेत कपात करावी, अशी मागणी तरस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1