Dehuroad: कोयत्यासह तरुणाला देहूरोड येथून अटक

एमपीसी न्यूज –  कोयत्यासह एका तरुणाला देहूरोड(Dehuroad) परिसरातील झेंडमळा येथून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.19) केली आहे.

आनंद नामदेव दणाने (वय 32 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे(Dehuroad) नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस  ठाण्यात पोलीस नाईक मयूर दळवी यांनी फिर्याद दिली आहे.

Pimple Gurav: वेश्याव्यवसायप्रकरणी तरुणाला अटक, युगांडा येथील पीडितेची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय त्याच्या ताब्यात 100 रुपयांचा कोयता घेवून फिरत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.