_MPC_DIR_MPU_III

Dehuroad : बहिणीकडून अभ्यास करून घेतल्यावरून शिक्षिकेकडून मुलाला अमानुष मारहाण

एमपीसी न्यूज – विद्यार्थी मुलाने त्याच्या बहिणीकडून अभ्यास करून घेतला, या कारणावरून खासगी क्लास चालवणा-या शिक्षिकेने मुलाला अमानुष मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी सातच्या सुमारास देहूरोड बाजार येथे घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

नाझवीन परवेझ शेख (रा. देहूरोड बाजार, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाची आई छाया तरुणसिंग (वय 40, रा. बारलोटा नगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया यांचा मुलगा चैतन्य तरुणसिंग (वय 10) हा रिपब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिकतो. त्याचा आणखी चांगला अभ्यास व्हावा यासाठी मागील दीड महिन्यापूर्वी त्याचा आरोपी शिक्षिका शेख यांच्या खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे चैतन्य क्लासला गेला. क्लासमध्ये चैतन्य याने त्याचा गृहपाठ त्याच्या बहिणीकडून का करून आणला ? या कारणावरून चैतन्यला काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये चैतन्यच्या हाताला व पायाला इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.