Dehuroad : लॉकडाऊन शिथिल होतोय, नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे- रघुवीर शेलार

Lockdown is relaxing, citizens should strictly follow the rules- Raghuveer Shelar

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत उद्या रविवारपासून (दि. 19) बुधवारपर्यंत ( दि. 23) लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. नागरिकांना जीवनावश्यक साहित्य खरेदी करता यावेत, या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून एकदाच घराबाहेर पडून साहित्य खरेदी करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत 140 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच हद्दीतील सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, रविवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने घेतला आहे.

त्यानुसार हद्दीतील सर्व दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत आठवड्यातून एकदाच जीवनावश्यक व गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडावे.

बाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करावा. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करावे, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेवून योग्य ते ओषध उपचार घ्यावेत. तसेच आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.