Dehuroad Lockdown News : देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने शनिवार, रविवारीचा ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने 11 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल यांनी आदेश काढला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात फक्त पुणे जिल्ह्यात शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन लागू होता. शनिवारी, रविवारी फक्त दूध विक्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट होत आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक झाली. यामध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा आदेश पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी काढला, तर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने आज, शनिवारी काढला.

या आदेशानुसार देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. किराणा, भाजी, दूध, बेकरी, चिकन, मटण, .भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई अशा आस्थापनांचा यात समावेश  आहे.  त्यामुळे व्यापाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. कृषी संबंधित दुकाने, त्याच्या संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे, देखभाल दुरुस्ती सेवा), पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थासाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने, चष्माची  दुकानेही 11 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत आता विकेंड लॉकडाऊन नाही. इतरदिवशी जे निर्बंध असतात तेच शनिवार, रविवारी लागू असणार आहेत. बाकीचे लॉकडाऊनचे सर्व नियम लागू असल्याचे कॅंटोन्मेंट बोर्डाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक झाली. यामध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा आदेश पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी काढला. असा आदेश देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने कालच काढणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असता. मात्र, आदेश काढण्यास उशीर झाल्याबद्दल शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ‘कॅंटोन्मेंट’ला पत्र पाठविले असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.