Dehuroad : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई किन्हईगाव येथे करण्यात आली असून आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हितेश ऊर्फ नाना सुनील काळे (वय 25, रा. किन्हईगाव, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संकेत घारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किन्हईगावात एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली त्यानुसार परिसरात सापळा रचून हितेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा ऐवज आढळून आला. बेकायदेशीर पिस्टल बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.