Dehuroad : अक्सा मस्जिदचे मौलाना उस्मान अली शेख यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज – बीआरटी मार्गातून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची रस्ता ओलांडणा-या दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये देहूरोड येथील अक्सा मस्जिदचे मौलाना उस्मान अली शेख यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 4) सायंकाळी पाचच्या सुमारास किवळे रस्त्यावर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना उस्मान अली शेख (वय 38) दुचाकीवरून रावेतकडून देहूरोडच्या दिशेने जाणा-या मार्गावरून सर्व्हिस रोडने जात होते. रस्ता ओलांडण्यासाठी त्यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग कमी केला आणि वळण घेऊ लागले. त्यावेळी बीआरटी मार्गातून भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीस्वाराने मौलाना शेख यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये मौलाना शेख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या अपघातामध्ये अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना बंदी असतानाही या मार्गातून वेगाची मर्यादा न पाळता वाहन चालविणे अत्यंत धोक्याचे आहे. वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे प्रत्येक अपघातातून स्पष्ट होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.