Dehuroad : सफाई कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धयांची वैद्यकीय तपासणी करा – भरत नायडू

एमपीसीन्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ठेकेदारी पद्धतीने काम करणारे सफाई कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना टेस्ट कारवाई, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केली आहे.

याबाबत नायडू यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या   संपूर्ण पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि देशासह जगभरात कोरोनाचे संकट आहे. सुदैवाने देहूरोड शहर कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोनामुळे अन्य ठिकाणी आतापर्यंत हजारो बळी गेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संकटाच्या सामना करताना अत्यावश्यक सेवा बजावणारे डॉक्टर, पोलीस आणि सफाई कामगार, परिचारिका यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत ठेकेदारी पद्धतीने काम करणारे अनेक सफाई कामगार आहेत. सध्या घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्या महिला कर्मचारीही आपला जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.

या सर्वांची कोरोना टेस्ट करणे गरजचे आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविणे गरजेजचे आहे. आपण स्वतः या बाबत लक्ष घालून कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी मागणी नायडू यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.