Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने शेलारवाडीतील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

0

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने वॉर्ड क्रमांक एकमधील शेलारवाडी गाव व शेलारमळा येथील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, भाजपचे माजी शहराध्यक्ष उद्धवराव शेलार, विद्यमान शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी, डॉ. किरण मुळे, डॉ. स्नेहल पानसरे तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील वैद्यकीय पथक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदींनी या आरोग्य तपासणी मोहिमेत सहभाग घेतला.

शेलारवाडी गावात एकूण ८६ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही मोहीम कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सातही वॉर्डांमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी,यांनी दिली.

अमित भेगडे, शाम मोहिते, विजय माळी, महेश आनंद शेलार, महेश शत्रुघ्न शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मेडिकल चेकअपचा लाभ घेतला, अशी माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like