Dehuroad : आमदार शेळके यांची तत्परता; शिवाजीनगरसाठी दोन फिरते शौचालय उपलब्ध

एमपीसी न्यूज : देहूरोड येथील शिवाजीनगर या भागामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे तो संपुर्ण भाग सील करण्यात आला आहे. या भागामध्ये काही ठिकाणी शौचालय नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत आमदार सुनील शेळके यांच्यावतीने तातडीने दोन फिरते शौचालय उपलबद्ध करुन दिले आहेत. त्यामुळे शिवाजीनगरमधील नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने शिवाजीनगर परिसर सील करण्यात आला आहे. या भागात यापूर्वीच कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था केली आहे . मात्र, हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. शिवाजीनगरमधून कुणालाही बाहेर अथवा आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्यामुळे शौचालयाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल आणि आमदार सुनील शेळके यांच्यासमोर ही समस्या मांडली. तसेच तातडीने तात्पुरते शौचालय उपलब्ध करण्याची मागणी केली.

त्यावर आमदार शेळके यांनी तातडीने दोन फिरते शौचालय शिवाजीनगर येथे पाठविले. यामध्ये एका शौचालयात दहा सीटची व्यवस्था आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल आणि नगरसेवक मारीमुत्तू उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.