Dehuroad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन मोबाईल हिसकवला; तिघांविरोधात गुन्हा, एकाला अटक

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणारे तीन आरोपी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आले. पत्ता सांगत असताना त्यांनी तरुणाच्या खिशातून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. हा प्रकार रावेत येथे घडला.

जगन्नाथ रामप्रसाद साहनी (वय 30, रा. म्हस्के वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अब्दुल शब्बीर उर्फ कादिर शेख (वय 20, रा. किवळे, देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहनी यांचे म्हस्के वस्ती रावेत येथे ओम साई स्क्रॅप नावाचे भंगारचे दुकान आहे. ते दुकानावर असताना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी सातच्या सुमारास अॅक्टिवा (एम एच 14 / ई आर 9571) वरून तीनजण आले. त्यांनी निगडीकडे जाण्याचा पत्ता विचारला. साहनी त्यांना पत्ता सांगत असताना आरोपींनी साहनी यांच्या खिशातून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.