Dehuroad : तरूणीला पाहून शिट्टी मारणा-या तरूणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरूणीला पाहून अश्लील हातवारे करत शिट्टी मारणा-या एका तरूणावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्ताक सलीम सय्यद (रा. शितळानगर, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकीतील 23 वर्षीय तरूणीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2017 रोजी आरोपीने तरूणीला पाहून अश्लील हातवारे करत शिट्टी मारली. तसेच कंबरेला स्पर्श करत विनयभंग केला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.