Dehuroad : आज नवे 17 कोरोना पॉझिटिव्ह; हद्दीतील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 227

Dehuroad Corona Update New 17 corona positive today; आजपर्यंत हद्दीत एकूण 227 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, गांधीनगर, बरलोटानगर, समर्थनगरी, उदयगिरी या परिसरात आज, शुक्रवारी एकूण 17 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 227 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज 17 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसर जास्त असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

कोरोनातून बरे झालेल्या 5 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 227 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

यापैकी सध्या 25 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 80 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्ण उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 74 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

 

पारशी चाळ, आंबेडकर नगर, चिंचोली, संकल्प नगरीत ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, आंबेडकर नगर, चिंचोली, संकल्प नगरी या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  या भागात उद्या शनिवारपासून 14  दिवसांसाठी ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला असून, सध्या या भागात निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.