Dehuroad News : गांधीनगर भागात गो हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा : मनसेची मागणी

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बॉर्ड हद्दीत गांधीनगर येथील डॉ. आंबेडकर नगर भागात बेकायदेशीरित्या गो हत्या करून मांस विक्री केली जात आहे. तसेच या साठी मोठ्याप्रमाणात पाण्याचा वापरही अवैधरित्या केला जात आहे. गो हत्या कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल आणि देहूरोड पोलिसांना निवेदन दिले आहे.

डॉ. आंबेडकर नगर भागात एका खोलीत बेकायदेशीरित्या गो हत्या केली जात आहे. तसेच तेथे गो मांसाची विक्री केली जात आहे. गो हत्या केल्यानंतर रक्त आणि अन्य मांस गटारात उघडयावर सोडले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

जनावरांची कत्तल केल्यानंतर साफसफाईसाठी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीरपणे पाण्याचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी एका संघटनेने पोलिसांना घटनास्थळी नेत या अवैध कत्तलखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर हा कत्तलखाना बंद होता.

मात्र, सध्या तो पुन्हा सुरु झाला आहे. या कत्तलखान्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशीरित्या गो हत्या करून मांस विक्री करणारे आणि मोठ्याप्रमाणात पाण्याचा वापर करणाऱ्यांवर जात कारवाई करण्याची मागणी दास यांनी निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.