Dehuroad News : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अरुण लाड हेच सक्षम उमेदवार – बबनराव भेगडे

एमपीसीन्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शिवाय त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांची जाण आहे. या आधी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्याने कोणतेही भरीव किंवा ठोस असे काम केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील पदवीधरांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हेच पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड आणि जयंत अजगावकर यांच्या प्रचाराबाबत आढावा व नियोजनासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, एसआरपी या पक्षांच्यावतीने देहूरोड शहर आणि देहू शहर परिसरामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज, गुरुवारी देहूरोड येथे पार पडली. त्यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, काँग्रेस शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू , नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, शिवसेना देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, तालुका समन्वयक रमेश जाधव, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष राणी पांडियन , महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा शीतल हगवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती वैरागर, राष्ट्रवादीचे किशोर गाथाडे, मिक्की कोचर, सतीश भेगडे, बाळासाहेब जाधव, रेणू रेड्डी, गणेश कोळी, धनंजय मोरे, रफिक शेख, सविता जाधव, राणी म्हसुडगे, नयन माळी,  अँन्थोनी स्वामी,चंदा पवार, शंकर स्वामी, मन्सूरबी काझी,समीर सत्यालू, हेमा रेड्डी, शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख बबन पाटोळे, उपशहरप्रमुख संदीप बालघरे, विभागप्रमुख विजू थोरी, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष गफूर शेख, शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, सरचिटणीस गोपाळ राव, सायबू तेलगू, येशू भंडारी, योगेश टाकळकर, तारिक रंगरेज,नारायण काळोखे, तोमनी राजू, अमित घेनंद आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत विठ्ठल शिंदे, हाजीमलंग मारीमुत्तू, ऍड. कृष्णा दाभोळे, सुनील हगवणे यांनीही मार्गदर्शन केले.

या वेळी ॲड. कृष्णा दाभोळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केले. आभार तानाजी काळभोर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.