Dehuroad News : ‘कॅंटोन्मेंट हद्दीतील ख्रिश्चन आणि मुस्लिम दफनभूमीचे सुशोभीकरण करा’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांची मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या ख्रिश्चन आणि  मुस्लिम दफनभूमीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने तातडीने दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम करण्याची मागणी प्रभाग क्रमांक 16 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवदेन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16च्या हद्दीलगत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची हद्द आहे.

सध्या कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शितळानगर येथील ख्रिश्चन आणि मुस्लिम दफनभूमीची दुरवस्था झाली आहे.
दफनभूमीची सीमाभिंत कोसळली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती मुस्लिम दफनभूमीची झाली आहे.

या दोन्ही दफनभूमीत किवळे, रावेत, विकासनगर, मामुर्डी, साईनगर या भागातील ख्रिश्चन आणि मुस्लिम मृत नारिकांचे दफनविधी केले जातात. त्यामुळे या दोन्ही दफनभूमीची दुरुस्ती आणि सुशोभीकरण महापालिकेने करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर मुकाई चोईक ते विकासनगर या रस्त्याचे सिमेंट क्रॉंकिटीकरण आणि श्रीनगर रस्ता ते बापदेव नगर या 40 मीटर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणीही नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी केली आहे.

या पूर्वी महापालिकेने मी केलेल्या मागणीनुसार  देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम केले होते. त्याच धर्तीवर आता तेथील मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम करावे, त्यासाठी महापालिकेच्या विशेष योजनेतील निधीचा वापर करावा. – मनोज खानोलकर ( माजी नगरसेवक )

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.