Dehuroad News : महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाचे धरणे आंदोलन

एमपीसीन्यूज : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्यावतीने देहूरोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली.

देहूरोड येथील सवाना हॉटेल चौक आणि तलाठी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कोकाटे, तलाठी अतुल माने यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका मुथा. माजी नगरसेविका सारिका नाईनवरे, देहूगावचे उपसरपंच संतोष हगवणे, भाजपचे शहर उपाध्यक्ष सूर्यकांत सुर्वे, तुकाराम जाधव आदी उपस्थित होते.

धरणे आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.