Dehuroad News : कोविड सेंटरसाठी भाजपकडून एक लाख तीन हजार रुपयांची आर्थिक मदत

देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावाढदिवस उत्साहात साजरा

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित सेवा सप्ताहात स्वच्छता दूत, कोरोना योद्धयांचा गौरव, कोविड सेंटरमध्ये कार्यरत कर्मचारी, रुग्णांना बिस्किट व मास्क वाटप, तसेच कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील कोविड केअर सेंटसाठी एक लाख तीन  हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली, अशी माहिती देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली.

देहूरोड कँन्टोमेन्ट बोर्डच्या कोविड सेंटरमध्ये सकाळी अकरा वाजता माजी राज्यमंञी संजय (बाळा) भेगडे व भाजपा मावळ तालूका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते कोविड सेंटरमधील डाँक्टर, कर्मचारी या कोरोना योद्धयांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोविड सेंटरमधील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करुन रुग्णांना बिस्किट व मास्क वाटप करण्यात आले.

त्यानंतर दुपारी बारा वाजता देहूरोड कँन्टोमेन्ट बोर्डाच्या पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात देहूरोड कँन्टोमेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल व उपाध्यक्ष रघुवीर शेलार तसेच नगरसेवक विशाल खंडेलवाल, नगरसेवक राहुल बालघरे, नगरसेविका सारिका नाईकनवरे, नगरसेविका अरुणा पिंजण यांच्या हस्ते बोर्डाच्या स्वच्छता दुतांना प्रशस्ती पत्रक व मास्क देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच सुभाष चौकात शहरातील सर्व सामान्य नागरिकांना मास्कचे वाटप करुन कोरोना विषाणू संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरातील कोविड केअर सेंटसाठी एक लाख 3 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. दरम्यान, पीएम केअर फंडासाठी आतापर्यंत एक लाख 80 हजारांचा निधी जमा करण्यात आला आहे. त्याचबरोबर देहूरोड बाजारपेठेतील महात्मा फुले अखिल मंडईच्या वतीने 51 हजार रुपये, विनायका नागरी सहकारी पतसंस्था आणि तळेगाव हार्डवेअरचे कुशालचंद मेलाबचंद यांच्यावतीने प्रत्येकी 21 हजार तर तुषार मोबाईलचे निरज गुंदेशा यांच्यावतीने 10 हजार रुपयांची मदत करण्यात आली.

त्याचबरोबर देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनिष कल्याणकर तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक पांडुरंग गोफणे यांना कोरोना योध्दा प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले. तर, अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी शहराध्यक्ष महावीर बरलोटा, उमेश जैन, गुरामित्तसिंग रत्तू, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मदन सोनिगिरा, सरचिटणीस तुकाराम जाधव, अंजनी बत्तल, महिला शहराध्यक्ष सारिका मुथ्था, उपाध्यक्ष कैलास राऊत, सोशल मीडिया शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहन गायकवाड, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष विनय बरलोटा, उत्तर भारतीय आघाडी जिल्हा अध्यक्ष उमाशंकर सिंग, देहूरोड शहराध्यक्ष दिनेश सिंग, दक्षिण भारतीय शहराध्यक्ष मुरगन चवालियन, युवा मोर्चा तालुकाउपाध्यक्ष अमोल नाईकनवरे, उपाध्यक्ष विलास शिंदे,  शहर उपाध्यक्ष सुर्यकांत सुर्वे, प्रदिप चव्हाण, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनिफ शेख, सतिश पिंजण, दिनेश शेलार, कृष्णा अनमोल, अजय लांगे, निरज गुंदेशा आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.