Dehuroad News : महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसची देहूरोड बाजारपेठेत निदर्शने

एमपीसीन्यूज : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच खाद्यतेल तसेच इतर जीवनावश्यक साहित्याची दरवाढ कमी करण्यासाठी व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आज, शुक्रवारी तीव्र निदर्शने करण्यात आले.

देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील, जिल्हा सरचिटणीस सोपान म्हस्के, महिला कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सीमा सावंत, तळेगाव दाभाडे महिला अध्यक्षा संध्याराजे दाभाडे आदींनी सहभाग घेतला.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा बाजारपेठेतून मोर्चा काढला. तसेच गावकामगार तलाठी अतुल गीते व देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांना निवेदन देण्यात आले.

महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडीयन, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष गफूर शेख यांच्यासह व्यंकटेश कोळी, विल्सन पालीवाल, संभाजी पिंजण, संगीता वर्धा, सिंधू शिरसाट तसेच येशू भंडारी, योगेश टाकळकर,आसिफ सय्यद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन दीपक सायसर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.