Dehuroad News : ‘देहूरोड कॅंटोन्मेंट’च्या वतीने ‘पब्लिक ई- कॅन्टोन्मेंट’ पोर्टल सुरू

ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या तक्रार करणे शक्य

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने ‘पब्लिक ई- कॅन्टोन्मेंट’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सुरुवातीला व्यापार परवाना, एम कलेक्ट आणि नागरिकांना तक्रारी दाखल करता येणार आहेत.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे.

या पोर्टलवर व्यापार परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तसेच, वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क भरता येईल आणि नागरिकांना घरबसल्या तक्रार देखील दाखल करता येऊ शकणार आहे.

व्यापार परवाना बाबत विविध प्रकारच्या माहितीसाठी https://dehuroad.cantt.gov.in या संकेतस्थळाला अथवा देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.