Dehuroad News : देहूरोड काँग्रेसच्यावतीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : भारतात संगण व डिजिटल क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष व देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या गांधीनगर येथील जनसंपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मारीमुत्तू यांच्यासह उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

‘देशाला आधुनिक विचार व जगातिक सन्मान मिळवून देण्याचे काम दिवंगत राजीव गांधी यांनी केले. त्यांनी देशाच्या विकासात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल भारतीयांनी राजीव गांधी यांच्याप्रती  कृतज्ञ राहिलं पहिजे’, अशा शब्दांत काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांनी गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडियन, गीता राजलिंगम रामनारायण, वासंती वेट्रीवेल, प्रमोद रोकड़े, व्यंकटेश मारीमुत्तू, शंकर मारीमुत्तू , मुत्तु अम्मावसी, आसिफ सय्यद, अबु वीरन, योगेश भोसले आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.