Dehuroad News : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देहूरोडला काँग्रेसचे धरणे

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारच्या कृषी  कायद्याच्या निषेधार्थ देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने  आज, गुरुवारी देहूरोड बाजारपेठेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यानंतर गावकामगार तलाठी अतुल गीते यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडीयन, देहूरोड शहराध्यक्षा ज्योती वैरागर, शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, कार्याध्यक्ष दीपक सायसर, अल्पसंख्यांक सेलचे मावळ तालुका अध्यक्ष गफूर शेख, सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव, वॉर्ड क्रमांक सातचे अध्यक्ष संभाजी पिंजण, युवा नेते सायबू तेलगू, व्यंकटेश रामणारायण, आकाश रामणारायण, योगेश टाकळकर, तारिक रंगरेज तसेच महिला कार्यकर्त्या- गीता रामणारायण, तवमनी राजू अम्मावशी,संगीता वर्धा, लक्ष्मी नाडार व सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.