Dehuroad News : ‘कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाच्या पावतीसह मास्कचेही वाटप करा’

माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशन यांच्या राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी

एमपीसीन्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई योग्य असली तरी दंडाच्या पावतीसह मोफत मास्कही देण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली सरकारकडे आहे.

याबाबत रमेशन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे. देहूरोड शहरात मास्क न वापरणाऱ्या वाहचालक आणि नागरिकांवर पोलिसांकडून आज, दंडात्मक कारवाई करण्यात आली.

देहूरोड पोलीस ठाण्याजवळील सेंट्रल चौक आणि देहूरोड  सिटी पोलीस चौकी येथे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना  श्रीजीत रमेशन यांनी कारवाईच्या ठिकाणी दंड आकारण्यात आलेल्या नागरिकांना कोरोनाचे नियम समजावून सांगितले. तसेच त्यांना मोफत मास्कही वाटप केले.

दरम्यान, पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईचे माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांनी स्वागत केले. मात्र, केवळ दंड आकारण्यापेक्षा नियम भंग करणाऱ्याला मोफत मास्कही वाटप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

या मागणीचे पत्र त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह संबंधित विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.