Dehuroad News: गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

एमपीसी न्यूज – देहूरोड (Dehuroad News) येथील ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रसाद बापूसाहेब लिमण सोशल फाऊंडेशनच्या वतीने सॅमसन मेमोरियल रिपब्लिक स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

Chikhali News : संतपीठाचे काम प्रगतिपथावर

प्रमुख पाहुणे युवा उद्योजक प्रसाद लिमण यांच्या हस्ते सुमारे 175 गरजू विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाला किरण गाडेकर, देहूरोड ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी समिती सदस्य रेक्स योहानन, डेनी आयझॅक, रॉय अलेक्झांडर मॅथ्यू, मायकेल सॅमसन, केपी अॅडम, श्रीजित रमेशन आणि युवा (Dehuroad News) नेते विजय थोरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मुलांना मिठाईचेही वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.