Dehuroad News : भीम आर्मीच्या वतीने देहूरोड येथे मोफत मास्क वाटप

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर भीम आर्मीच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड शहरात मोफत मास्क वाटप करण्यात आले. सुमारे एक हजार नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.

तसेच किवळे गावातील स्नेह सावली आपलं घर वृद्धाश्रमात धान्य, कोलगेट, साबण, चहा पावडर, साखर, तांदूळ आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

भीम आर्मीचे शहराध्यक्ष प्रकाश महासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आले. देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौक, रेल्वे स्थानकाजवळील महर्षी वाल्मिकी चौक, सवाना हॉटेल चौक या ठिकाणी नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भीम आर्मीचे शहराध्यक्ष प्रकाश महासे, पुणे जिल्हा महिला संघटिका रिना टाक, उपाध्यक्ष अमित इंगळे, सचिन माने, सचिन धेंडे, मनप्रीतसिंग रत्तू, विशाल बिडलान, अमोल म्हेत्रे, बाबु तुपदोर, राजु पिल्ले, अजय पंचगुंडे, गणेश मारी, सुधीर वाघमारे, सागर मुंडास, विक्रम वेटम, कपिल गायकवाड, बुद्ध विहार कृती समितीचे  विजय गायकवाड, शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी, शशिकांत सप्पागुरु, लालचंद शर्मा, विनोद  भंडारी, सागर  लांगे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.