शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Dehuroad News : पोलिसांना सॅनिटायझर, मास्क, साबण आणि हँडग्लोव्हचे वाटप

एमपीसीन्यूज : सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी आणि मल्याळी समाजम देहूरोड यांच्या वतीने पोलीस, लष्कर आणि देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर, मास्क, साबण आणि हँडग्लोव्हचे वाटप करण्यात आले.

सेवा सोशल सर्व्हिस सोसायटीचे फादर सानू सॅम, मल्याळी समाजम देहूरोडचे अध्यक्ष जिजी नायर, जोस जॉन, साजन वर्गीस, विल्सन वर्गीस, बिजीश आर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन आदींच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात
आले.

सध्या कोरोना काळात देहूरोड पोलीस, स्टेशन हेडक्वार्टर आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील अधिकारी आणि कर्मचारी आपली सेवा बजावीत आहेत. त्यामुळे या कोरोना योद्धयांना सॅनिटायझर, मास्क, साबण आणि हँडग्लोव्हचे किट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एकूण तिनशे किटचे वाटप करण्यात आले.

हे साहित्य वाटप केल्याबद्दल सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, कॅंटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी आणि मल्याळी समाजम देहूरोड यांचे कौतुक केले.

spot_img
Latest news
Related news