Dehuroad Corona News : ‘रक्तदान करा, एका लाखाचा विमा मिळवा’; देहूरोड शिवसेनेचा उपक्रम

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देहूरोड शहर शिवसेनेच्यावतीने येत्या मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या दात्याचा एक लाखाचा अपघात विमा काढण्यात येणार आहे.

देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयासमोरील ईरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात येणार आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उदघाटन होईल.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शैला खंडागळे, युवा सेना तालुका अधिकारी अनिकेत घुले, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, तालुका समन्वयक रमेश जाधव, शहर संघटिका सुनंदा आवळे, माजी शहरप्रमुख महेश धुमाळ, राजेश शेलार, शहर समन्वयक अरुण गोंटे , विभागप्रमुख शशिकांत सप्पागुरु, विजू थोरी, शहर संघटक संदीप गोंटे, माजी तालुका उपप्रमुख बबन पाटोळे, शहर सल्लागार विलास हिनुकले, देवा कांबळे, युवा सेनेचे विशाल दांगट आदी आदी रक्तदानासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिबिराचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख संदीप बालघरे यांनी दिली.

संदीप बालघरे, महेश धुमाळ आणि शशिकांत सप्पागुरु यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. जास्तीस्त जास्त तरुणांनी शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.