Dehuroad News : सवलत मिळेपर्यंत वाढीव वीज बिले भरु नका -बाळा भेगडे

देहूरोडला भाजपकडून वाढीव वीजबिलांची होळी

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार गेले. छोटेमोठे व्यववसाय बंद पडले. अशा परिस्थितीत महावितरणकडून नागरिकांना वाढीव वीज बिले पाठवविण्यात आली. त्यावर शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफी करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, सरकार घुमजाव करून नागरिकांची फसवणूक करीत आहे. जोपर्यंत वीजबिलात सवलत मिळत नाही तोपर्यंत वाढीव वीज बिले भरू नयेत, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वीज ग्राहकांना केले. तसेच विधी वीज बिलात सवलत न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही भेगडे यांनी यावेळी दिला.

कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊनमध्ये राज्यभरात अनेकांना महावितरणच्या जास्त वीज बिलाचा फटका बसला. अनेकांनी ही वाढीव बिल भरली देखील. यातून सर्वांना दिलासा मिळेल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, आता सरकारकडून या प्रश्नी घुमजाव केले.

या विरोधात देहूरोड येथे भाजपाच्यावतीने वाढीव वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, देहूरोड कँन्टोमेन्ट उपाध्यक्ष रघूविर शेलार, नगरसेविका सारिका नाईकनवरे, नगरसेवक राहुल बालघरे, नगरसेवक विशाल खंडेलवाल, माजी अध्यक्ष कैलास पानसरे, माजी अध्यक्ष मदन सोनिगरा, गुरुमित्तसिंग रत्तू, महिला अध्यक्ष सारिका मुथ्था, तुकाराम जाधव, अंजनी बत्तल, जेष्ठ नेते महावीर बरलोटा, सोशल मिडिया जिल्हा अध्यक्ष जोगिंदर दुमडे, उत्तर भारतीय आघाडी जिल्हा अध्यक्ष उमाशंकर सिंग, कँन्टोमेन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संजय पिंजण, प्रभारी कैलास राऊत, शहर उपाध्यक्ष सुर्यकांत सुर्वे,युवा मोर्चा अध्यक्ष रोहन गायकवाड,व्यापारी संघटना अध्यक्ष विनय बरलोटा, सरचिटणीस सुनिल खाणेकर, दक्षिण भारतीय मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवा कंदस्वामी, शहर अध्यक्ष मुरगन चवालियन, दिलिप नायर, युवा मोर्चा चिटणीस अजय अडसूळ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.