Dehuroad News : भंडारा डोंगरावरील हरिनाम सप्ताहाची सांगता

एमपीसी न्यूज – भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने (Dehuroad News)  झाली. या डोंगरावर माघ शुद्ध दशमीचा मोठा सोहळा होत असतो. कोरोनामुळे दोन वर्ष हा सप्ताह मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. यंदा 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात या सप्ताहाचे आयोजन केले होते.

त्यामध्ये पोपट महाराज कासारखेडेकर, एकनाथ महाराज चत्तरशास्त्री, जलाल महाराज सय्यद, माऊली महाराज कदम, ज्ञानेश्वर महाराज वाघ, पंकज महाराज गावडे, बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांची कीर्तने झाले.

Maharashtra News : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीची बाजी

डॉ. विकासानंद मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. मिसाळ महाराज कीर्तनात म्हणाले, देवाला आपले म्हणून प्रेम केल्यास तो अधिक जवळ येतो. त्यामध्ये भाव आणि आत्मियता आवश्यक असते. तो भावाचा भुकेला असतो. गेल्या काही दिवसांपासून वारकरी संतांवर काही लोकांकडून टीका केली जाते. त्याची पात्रता नसताना ती केली जाते. त्यामुळे अशा लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारने कायदा करावा. जेणेकरुन अशी संतांवर टीका होणार नाही.

कीर्तनापूर्वी गाथेची दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी महाप्रसाद देण्यात आला. भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

बाळासाहेब काशिद म्हणाले, हे मंदिर उभारण्यासाठी खूप हात झटत आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर प्रशासनानेही गायरानाची जागा देण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. प्रशासनाकडून पीएमआरडीएच्या माध्यमातून पाचशे कोटींचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मंदिराचे काम लवकर पूर्ण (Dehuroad News) करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वर्षभरात मंदिर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुयात, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.