Dehuroad News : ‘घोरवडेश्वर बाईक अँड हाईक’मध्ये पाचशे सायकलस्वारांचा सहभाग

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय वन्यजीव महोत्सव निमित्त इन्डो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीने घोरवडेश्वर बाईक अँड हाईक हा उपक्रम घेण्यात आला , पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 500 हून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष होते.

मुकाई चौक रावेत येथून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महावितरण बोर्डचे महेंद्र दिवाकर, स्वानंदी फाऊंडेशनचे शंकर उनेचा, आयएएसचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या हस्ते ध्वज दाखवण्यात आला.

या उपक्रमांमध्ये अकरा किलोमीटर सायकलिंग आणि चार किलोमीटर घोराडेश्वर येथील डोंगरावर हायकिंग घेण्यात आले. याप्रसंगी गहुंजे ग्रामपंचायतीचे सरपंच लखन बोडके, सुमित बोडके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

घोरवडेश्वर बाईक अँड हाईक नियोजनामध्ये इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे सुशील मोरे, माधुरी पाचपांडे, श्रीकांत चौधरी, गिरीराज उमरीकर, अमित पवार, अविनाश चौगुले, रवी पाटील, प्रमोद चिंचवडे, अभिनंदन कासार, गोविंद घाटकर, सोनल वामन, अजित गोरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.