Dehuroad News : फूटबॉलपटू आलोक शर्मा यांचा खेलरत्न पुरस्काराने गौरव

एमपीसीन्यूज : खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय फूटबॉलपटू आलोक शर्मा यांचा खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.  

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्तीमत्वाचा, संस्थांचा आणि कोरोना योद्ध्यांचा खासदार श्रीनिवास पाटील, धैर्यशील माने आणि सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शा. ब. मुझुमदार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी शर्मा यांना खासदार  बारणे  आणि खासदार माने यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे धनाजी बारणे, गजाजन चिंचवडे, बशीर सुतार आणि रवी नामदे उपस्थित होते.

आलोक शर्मा हे देहूरोड येथील इंद्रायणी स्पोर्ट क्लबचे संस्थापक आणि प्रशिक्षक आहेत. ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनच्या फिफा ववर्ल्ड कप संघ निवड समिती सदस्य म्हणून त्यांची 2015  मध्ये निवड करण्यात आली.

फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघासाठी महाराष्ट्रातून खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. या संधीचे सोने करीत आलोक यांनी पुणे एफसी संघातील अनिकेत जाधव आणि हेनरी ऍंथोनी या दोघांची निवड केली.

2017 साली झालेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी सहभाग घेतला. सध्या हे दोन्ही खेळाडू भारताच्या फूटबॉल संघात खेळत आहेत.

शर्मा यांनी आतापर्यंत अनेक फूटबॉलपटू घडविले आहेत. पुणे विद्यापीठ संघासाठी 50 ते 60 खेळाडू, राराज्यस्तरीय संघासाठी 10 खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केले. पुणे विद्यापीठ फुटबॉल संघासाठी 12  वर्ष ते मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

फूटबॉलची आवड असणाऱ्या परंतु आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार संस्थेत प्रशिक्षण घेऊ न शकणाऱ्या गोरगरीब मुलांना ते मोफत प्रशिक्षण देतात. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक खेळाडू आज राज्य आणि राष्ट्रीय संघातून खेळत आहेत. अनेक व्यवसायिक संघातही त्यांचे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.

शर्मा यांच्या फूटबॉलमधील या उल्लेखनीय कार्याची दखल घेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा खेलरत्न पुरस्काराने यथोचित सन्मान करण्यात आला.

संवेदनशील स्वभावाच्या शर्मा यांनी कोरोना संकटात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये देहूरोड शहरातील झोपडपट्टी भागातील शेकडो गोरगरिबांना मदतीचा हात दिला. जवळपास पावणे दोन लाखांच्या जीवनावश्यक साहित्याचे त्यांनी मोफत वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.