Dehuroad News: कत्तलखान्यात नेलेल्या चार जनावरांची गो सेवकांनी केली सुटका

चार संशयित आरोपी घरातच जनावरांची कत्तल करत होते. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या गो सेवकांनी कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेलेल्या चार जनावरांची सुटका केली. ही कारवाई गोसेवकांनी रविवारी (दि.6) सकाळी देहूरोड मधील गांधीनगर येथे केली.

मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू नूरमहंमद कुरेशी, सोहेल शेरअली पिरजादे, बबलू (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गो सेवक प्रवीण फाकटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हा गो सेवकांना माहिती मिळाली की, देहूरोड येथील गांधीनगर येथे एका कत्तलखान्यात काही जनावरांची कत्तल केली जात आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र राज्याचे मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गोसेवकांनी गांधीनगर येथील कत्तलखान्यावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी कत्तलखान्यात एक गोवंशाची कत्तल केल्याचे आणि चार जनावरे कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले.

पोलिसांच्या मदतीने चार जनावरांची सुखरूपपणे सुटका केली. सुटका केलेल्या जनावरांचे पुनर्वसन पांजरपोळ येथील गो शाळेत केले जाणार आहे. चार संशयित आरोपी घरातच जनावरांची कत्तल करत होते. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.