-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dehuroad News : कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांच्या हस्ते कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे हे मशीन सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बजरंग दलाचे संभाजी बालघरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश भुजबळ, युवा सेनेचे राजेंद्र तरस आदी उपस्थित होते. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलवावे लागते. रुग्णांची ही गैरसोय दूर करण्यासाठी व त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांनी पुढाकार घेतला.

आज, सकाळी अकरा वाजता गर्ग यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच कोरोना बाधित रुग्णांना जेवण उपलब्ध करून देण्याची तयारीही गर्ग यांनी दर्शविली आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कोविड सेंटरसाठी विकास गर्ग यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहे. समाजाप्रती गर्ग यांनी दाखविलेले दातृत्व वाखाण्याजोगे आहे. या पूर्वीही अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सध्या कॅंटोन्मेंट बोर्डाकडे एकूण चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असून, त्याचा कोरोनाबाधित रुग्णांना निश्चित लाभ होणार आहे. रामस्वरूप हरितवाल : मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn