Dehuroad News : दिव्यांगांना भेटून फुटबॉल खेळण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली- अलोक शर्मा

एमपीसीन्यूज : राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळल्यानंतर आता फुटबॉलपासून निवृत्ती घेण्याचा विचार करीत होतो. मात्र, माई बाल भवनातील दिव्यांगांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिल्यानंतर माझा निर्णय मी रद्द केला. जीवनात नैराश्य आलेल्या, अपयशाने ना उमेद झालेल्या तसेच आत्महत्येचा विचार करणाऱ्या मंडळींनी या माई बाल भवनाला आवर्जून भेट द्यावी. येथील दिव्यांग, दृष्टिहीन मुले आणि मुलींची जिद्द पाहून त्यांनाही नवी स्फूर्ती मिळेल आणि त्यांच्या मनातील नैराश्य विना औषधोपचाराने कायमचे दूर होईल, असा विश्वास राष्ट्रीय फुटबॉलपटू व प्रशिक्षक आलोक शर्मा यांनी व्यक्त केला.

देहूरोड, मामुर्डी येथील माई बाल भवनात आयोजित इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शर्मा बोलत होते.

संस्थेच्या अध्यक्षा प्रतिज्ञा देशपांडे, विश्वस्त प्रवीण देशपांडे, मधुकर इंगळे, फुटबॉलचे प्रशिक्षक विक्रम सिंग, स्वयंसेवक शाम बिरमाली, रुचिरा इंगळे आदी उपस्थित होते.

माई बाल भवनातील सहा दृष्टिहीन मुली महाराष्ट्र संघाकडून फुटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांना फुटबॉलविषयी तसेच फिटनेस बाबत शर्मा यांनी सखोल मार्गदर्शन केले.

तसेच या दिव्यांग मुलींमध्ये फुटबॉल खेळाविषयी असलेली आवड आणि राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत त्यांनी मारलेली मजल याबाबत शर्मा यांनी त्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.