Dehuroad News: चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा भावाच्या मदतीने पत्नीने केला खून

मृत लखीचंद आणि आरोपी अनिता पती-पत्नी आहेत. लखीचंद हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिऊन तिला मारहाण करत असे.

एमपीसी न्यूज – पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने तिच्या भावाच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. ही घटना रविवारी (दि.6) रात्री दहा वाजता जाधववस्ती येथे घडली.

लखीचंद प्रभुदयाल शर्मा (वय 40, रा. जाधववस्ती, ता. हवेली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. प्रेमचंद प्रभुदयाल शर्मा (वय 58) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी पत्नी अनिता लखीचंद शर्मा (वय 35), पत्नीचा भाऊ तुकाराम भीमाशंकर नाटेकर (वय 29) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लखीचंद आणि आरोपी अनिता पती-पत्नी आहेत. लखीचंद हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिऊन तिला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून अनिताने तिचा चुलत भाऊ आरोपी तुकाराम याच्यासोबत मिळून लखीचंद यांचा गळा दाबून खून केला.

पोलिसांनी तुकाराम याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.