Dehuroad News : पोलिसांच्या संगनमताने खुलेआम अवैधरित्या दारू विक्री – श्रीजित रमेशन

एमपीसी न्यूज – देहूरोडमध्ये (Dehuroad News) अजूनही काही पोलिसांच्या संगनमताने खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. दारुची विक्री केली जाते. या अवैध धंद्याला पोलिसांचा पाठिंबा असल्याचा आरोप करत देहूरोड पोलिसांना आयुक्तालयाच्या कारवाईची भीती नाही? का असा सवाल आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केला आहे.

रमेशन म्हणाले, आमच्या टीमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये देहूरोड पोलीस स्टेशनपासून अगदी जवळ इंदिरानगर कॉर्नर येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री आणि सेवन दिसून आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने नुकतेच निगडी, वाकड आणि देहूरोड भागातील विविध अवैध धंद्यावर छापे टाकले.

Pune Police : अटक होऊ नये म्हणून आरोपीकडून लाच घेताना पोलीस शिपाई अटक

छापेमारीनंतर अनेक पोलीस अधिकारी आणि पोलिसांची बदली झाली. मात्र, देहूरोड पोलीस ठाणे व वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर कोणतीही कारवाई (Dehuroad News) झाली नाही. देहूरोडमध्ये अजूनही काही पोलिसांच्या संगनमताने खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. किमान यावेळी तरी पोलीस आयुक्त देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाई करतील, अशी अपेक्षा रमेश यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.