Dehuroad News : ‘शेलारवाडी येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामात सुधारणा करा’

एमपीसीन्यूज : पुणे-लोणावळा लोहमार्गावर बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ शेलारवाडी गावाच्या हद्दीत जुन्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. या कामात सुधारणा करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक रघुवीर शेलार यांनी केली आहे.

या संदर्भात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व स्थानिक नगरसेवक शेलार यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लहू शेलार, अतुल शेलार आणि अमित भेगडे आदींच्या शिष्टमंडळाने देहूरोड रेल्वे स्थाकाचे अभियंता मुकेश कुमार यांना निवेदन दिले.

_MPC_DIR_MPU_II

शेलारवाडी येथे लोहमार्गावर भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, पावसाळा सुरु झाल्यानंतर येथे पाणी साचून स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात घेता लोहमार्गाजवळ देहूरोडच्या दिशेने जुना ओढा वाहत आहे. या ओढ्याला योग्य तो उतार देऊन रस्त्याच्या समांतर केल्यास पाणी साचून राहण्याची समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

त्यासाठी भुयारी मार्ग तयार करताना योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.