Dehuroad News : चिंचोलीत आमदार समर्थकाचा फ्लेक्स फाडला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना

एमपीसीन्यूज : गावातील गोरगरीब नागरिकांना घरगुती पीठ गिरणी आणि वॉटर फिल्टर पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेला फ्लेक्स अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या अंधारात फाडून टाकल्याचा प्रकार देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील चिंचोली गावात उघडकीस आला. राजकीय कुरघोडीतून हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा चिंचोलीसह देहूरोड परिसरात सुरु आहे.

पै. धनंजय सावंत यांनी चिंचोली गावातील गोरगरीब नागरिकांसाठी सवलतीच्या दरात पीठ गिरणी आणि वॉटर फिल्टर उपलब्ध केले आहेत. बुधवारी ( दि. 3) देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पानसरे आणि डीएडी डेपो कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष पंडित जाधव यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी सावंत यांनी गावात फ्लेक्स लावले आहेत.

मात्र, बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने चिंचोली -अशोकनगर येथे लावलेला फेल्क्स फाडला. हा फ्लेक्स फाडताना धनंजय सावंत यांचा चेहरा फाडण्यात आला. याच फ्लेक्सवर आमदार सुनील शेळके यांचाही फोटो वापरण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या फोटोला कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही.

_MPC_DIR_MPU_II

आज ( गुरुवारी ) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. धनजंय सावंत हे देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची आगामी निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी त्यांनी वर्षभरापासून विविध सामाजिक उपक्रम रावबवून जनाधार वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

सावंत हे आमदार सुनील शेळके यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. असे असताना मावळ विधानसभा मतदार संघातील चिंचोली गावात आमदार समर्थकाचा कार्यकर्त्याचा फेल्क्स फाडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सावंत यांचा फ्लेक्स कोणी व का फाडला याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

जनतेशी बांधीलकी जपणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या परीने मी जनतेची सेवा करीत आहे. याच उद्देशाने मी पन्नास टक्के सवलतीमध्ये घरगुती पीठ गिरणी आणि वॉटर फिल्टर जनतेसाठी उपलब्ध केले आहेत. ही महिती गोरगरिबांपर्यंत पोहोचावी यासाठी फ्लेक्स लावले. या फ्लेक्सवर कुणावर टीका केलेली नव्हती. तरीही समाजकंटकांनी भ्याड वृत्तीने माझा फेल्क्स फाडला. याबाबत लवकरच देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे.  पै.धनंजय सावंत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.